पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून प्रवाशाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:25+5:302021-09-18T04:22:25+5:30

५ सप्टेंबर रोजी राहाता तालुक्यातील एकरुखे येथे ही मारहाणीची घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेले दिलीप आभाळे (रा. एकरुखे, ...

Murder of a passenger by a third party for non-payment | पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून प्रवाशाची हत्या

पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून प्रवाशाची हत्या

५ सप्टेंबर रोजी राहाता तालुक्यातील एकरुखे येथे ही मारहाणीची घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेले दिलीप आभाळे (रा. एकरुखे, ता. राहाता) यांचा उपचारादरम्यान १६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हे शाखेने १७ सप्टेंबर रोजी आठ आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी फरार आहे. सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (वय २६), विकास दशरथ धनवडे उर्फ रूपाली सलोनी शेख (वय २५), आनंद फौजी शेलार उर्फ रुचिरा सलोनी शेख (वय २०, तिघे रा. श्रीरामपूर) व लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख (रा. कोपरगाव) यांच्यासह अभिजित उर्फ गोट्या बाळू पवार (वय २३), गौरव उर्फ सनी भागवत पवार (वय १९), राहुल उत्तम सोनकांबळे (वय २२), अरबाज सत्तार शेख (वय १९, रा. चौघे श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचा साथीदार इरफान रज्जाक शेख हा फरार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, हेड कॉस्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, पोलीस नाईक शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रविकिरण सोनटक्के, संतोष लोढे, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना राहाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

-------------------

काय आहे घटना ?

फिर्यादी महेश दिलीप आभाळे यांचे वडील दिलीप आभाळे हे त्यांचे मित्र निवृत्ती उर्फ नंदू चांगदेव क्षीरसागर असे दोघे ५ सप्टेंबर रोजी गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात होते. यावेळी गणेशनगर फाटा येथे त्यांना काही तृतीयपंथीयांनी अडवून पैशांची मागणी केली. त्यावरून तृतीयपंथी व आभाळे यांच्यात वाद झाला. हाच राग मनात धरून तृतीयपंथी व त्यांच्या साथीदारांनी त्याच दिवशी एकरुखे येथे जाऊन आभाळे व क्षीरसागर यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या हल्ल्यात आभाळे हे जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

...............

फोटो १७ एलसीबी

ओळी- मारहाण करून खून करणाऱ्या चार तृतीयपंथींसह इतर चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Web Title: Murder of a passenger by a third party for non-payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.