अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर पत्ते खेळताना एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:13 IST2020-05-16T21:13:13+5:302020-05-16T21:13:25+5:30
अहमदनगर: शहरातील पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती येथे पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मारहाण होऊन एका व्यक्तीचा जागीच खून झाला.

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर पत्ते खेळताना एकाचा खून
अहमदनगर: शहरातील पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती येथे पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मारहाण होऊन एका व्यक्तीचा जागीच खून झाला.
नंदकिशोर गणपतराव मंचरे (वय 52 रा. तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.
या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी मारहाण करणारा आरोपी सचिन नानासाहेब भोजने (22 रा. तागडवस्ती) याला अटक केली असून त्यांच्यासोबत पत्ते खेळणारे इतर दोन जण व जागामालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मयत मंचरे, आरोपी भोजने व त्यांचे इतर दोन साथीदार तागडवस्ती येथील मोकळ्या जागेत झाडाखाली पत्ते खेळत होते. पत्ते खेळत असताना मंचरे व भोजने यांच्यात वाद झाला या वादातून भोजने याने मंचरे यांना मारहाण केली. या मारहाणीत मंचरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. या घटनेबाबत तोफखाना पोलिसांना माहिती मिळतातच अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हरुण मुलांनी, उपनिरीक्षक सुरसे यांनी घटनास्थळी भेट देत मुख्य आरोपी भोजने याच्यासह इतरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.