विसापुरात मनोरुग्ण महिलेची हत्या

By | Updated: December 5, 2020 04:40 IST2020-12-05T04:40:24+5:302020-12-05T04:40:24+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेची गुरुवारी रात्री अज्ञाताने हत्या केली. लता मधुकर शिंदे ...

Murder of a mentally ill woman in Visapur | विसापुरात मनोरुग्ण महिलेची हत्या

विसापुरात मनोरुग्ण महिलेची हत्या

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेची गुरुवारी रात्री अज्ञाताने हत्या केली. लता मधुकर शिंदे (रा. विसापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मनोरुग्ण होती. ती महिला रात्रंदिवस विसापूर शहरातील रस्त्यावर फिरत असे. मात्र, गुरुवारी रात्री अज्ञाताने तिची हत्या केली. शुक्रवारी सकाळी विसापूर व पिंपळगाव पिसा सीमेवर तुटून गेलेल्या उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या मानेवर जखम झालेली होती. बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Murder of a mentally ill woman in Visapur