स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने परप्रांतीय कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:53+5:302021-01-19T04:22:53+5:30
या गुन्ह्यातील आरोपीला तोफखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली. बाबादिन झंडू निसाद (वय ३९, रा. चकला, जि. बांदा, ...

स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने परप्रांतीय कामगाराचा खून
या गुन्ह्यातील आरोपीला तोफखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली. बाबादिन झंडू निसाद (वय ३९, रा. चकला, जि. बांदा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर महेश सिवराम निसाद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक अशोक रामस्वरूप निसाद यांनी फिर्याद दाखल केली आहे. मृत बाबादिन व आरोपी महेश हे एकाच गावातील असून, हे दोघे अशोक निसाद याच्या स्क्रॅपच्या दुकानात काम करत होते. १६ जानेवारी रोजी बाबादिन हा स्वयंपाक करत नसल्याच्या कारणातून महेश याने त्याच्यासोबत भांडण केले. यावेळी महेश याने बाबादिन याला लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यात बाबादिन याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने महेश निसाद याला नगर शहरातून बारा तासांच्या आत अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुंढे पुढील तपास करत आहेत.