नेवासा तालुक्यात शेतीच्या वादातून वकिलासह दोघांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:00 IST2019-10-02T16:00:15+5:302019-10-02T16:00:37+5:30
नेवासा : तालुक्यातील जेऊर हैबती येथे शेतीच्या वादारून दोघांचा खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जेऊर हैबती येथे मागील शेतीच्या वादातून सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत अॅड.संभाजी ताके व त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी या दोघांचा खून झाला आहे. दुस-या व्यक्तीची अद्याप ओळख अजून पटलेली नाही.

नेवासा तालुक्यात शेतीच्या वादातून वकिलासह दोघांचा खून
नेवासा : तालुक्यातील जेऊर हैबती येथे शेतीच्या वादारून दोघांचा खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
जेऊर हैबती येथे मागील शेतीच्या वादातून सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत अॅड.संभाजी ताके व त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी या दोघांचा खून झाला आहे. दुस-या व्यक्तीची अद्याप ओळख अजून पटलेली नाही. आरोपींनी कु-हाडीने त्यांच्यावर हल्ला केला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेवासा पोलीसांनी घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रणजित डेरे व कर्मचा-यांनी घटना स्थळी धाव घेतली. दोन्ही व्यक्तीचे मृतदेह उत्तर तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.