कोपरगावात २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खून ; दोन आरोपीना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:50 IST2020-07-07T11:44:17+5:302020-07-07T11:50:54+5:30
कोपरगाव : आपापसातील किरकोळ शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या वादाचा विपर्यास होऊन एका २५ वर्षीय परप्रांतीय मजुराच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला.

कोपरगावात २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खून ; दोन आरोपीना अटक
कोपरगाव : आपापसातील किरकोळ शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या वादाचा विपर्यास होऊन एका २५ वर्षीय परप्रांतीय मजुराच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला.
सोमवारी (दि.६) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर ही घटना घडली आहे. सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी दिगंबर ज्ञानदेव होगे ( वय ५२, वर्षे, धंदा मजुरी, रा. भारत गॅस एजंन्सी जवळ, शिंगी-शिंदे नगर, कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून राहुल राजव्यापारी मोंडल ( रा. माजेग्राम, राणाघाट, नदिया, पश्चिम बंगाल ) व सुकल मंगला हेमब्राम ( रा. छोरा कॉलनी, छोरा हटला, छोरा बर्धमान, बमन बाग्राम, पश्चीम बंगाल ) या दोघा आरोपीवर मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या खुनातील दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.