महापालिकेतील राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:51+5:302021-07-05T04:14:51+5:30
महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली. सर्वाधिक संख्याबळ असूनही तब्बल अडीच वर्षांनंतर सेनेला सत्तेचा सोपान गाठता ...

महापालिकेतील राजकारण
महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली. सर्वाधिक संख्याबळ असूनही तब्बल अडीच वर्षांनंतर सेनेला सत्तेचा सोपान गाठता आला. त्याचा आनंद शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबईहून आलेल्या भाऊंच्या उपस्थित साजरा करण्याचा बेत आखला. पार्टी रंगात आली. पण, राड्याची परंपरा असलेल्या शिवसैनिकांनी तु-तू-मै करत राडा घातलाच. या राड्याने महापौर निवडणुकीच्या आनंदावरही विरजन पडले. रात्रीचा झालेला गोंधळ पडद्याआड करण्याचा भाऊंनी अटोकाट प्रयत्न केला. मात्र हॉटेलमधीलच एका कर्मचाऱ्याने हाणामारी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायर झाला. ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली, ते हॉटेलही शिवसैनिकांचेच होते. असे असूनही सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला, पण रात्री काय झाले, यावर आम्ही नव्हतोच, असे सांगून सेनेच्या नगरसेवकांनी पार्टीवर पडदा टाकला.
....
राष्ट्रवादीत ‘कही खुशी की गम’
महापालिकेत पारंपरिक विरोधक असलेल्या शिवसेनेला पाठिंबा दिला. वाटाघाटीत उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवडही झाली, परंतु शिवसेनेची झालेली आघाडी अनेकांना रुचली नाही. सेनेशी केलेल्या आघाडीने आपल्याला कोणताही धोका नाही, झाला तर त्याचा फायदाच होईल, असे महापालिकेतील एक ज्येष्ठ नगरसेवक ज्युनियर नगरसेवकांना सांगत होते. यावरून बराच वेळ चर्चा रंगली होती, पण पुढे कसे होणार, ज्यांना वर्षानुवर्षे विरोध केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसविण्याची वेळ सेना- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आली असून, त्यांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे. महापौर उपमहापौर निवडीनंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र जल्लोष केल्याने मैत्री झाली खरी, पण जुळतील का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.