महापालिकेने वैद्यकीय कॉलेज उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:41+5:302021-03-14T04:19:41+5:30

नवसुपे व दलित आघाडी अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांना देण्यात आले. महानगरपालिका ...

Municipal Corporation should set up a medical college | महापालिकेने वैद्यकीय कॉलेज उभारावे

महापालिकेने वैद्यकीय कॉलेज उभारावे

नवसुपे व दलित आघाडी अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांना देण्यात आले.

महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व भूभागाची व्याप्ती पाहता पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांकडे जाणाऱ्या नागरिकांचे शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणारे लोंढे थांबविण्यासाठी महानगरपालिकेने आपल्या शहरातील नागरिकांच्या स्वत:च्या मुलांसाठी स्वतःचे वैद्यकीय विद्यालय सुरू करावे, जेणेकरून त्या ठिकाणी माफक दरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन शहराला मोठे वैभव विद्यालयाने प्राप्त होईल. शहराचा वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. खासगी विद्यालयात विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल. तसेच नगर महापालिकेच्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नगर शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय विद्यालये उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्याकडे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी निवेदनाद्वारे केली.

१३ अविनाश घुले

Web Title: Municipal Corporation should set up a medical college