अनधिकृत फलक लावणा-यांवर महापालिका करणार गुन्हे दाखल, कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:15 IST2018-04-11T13:15:09+5:302018-04-11T13:15:29+5:30
शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे.

अनधिकृत फलक लावणा-यांवर महापालिका करणार गुन्हे दाखल, कारवाई सुरू
अहमदनगर : शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे.
आज सकाळपासूनच प्रशासनाने फलक व होर्डिंग हटावची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील अनाधिकृत फलकांवर कारवाई सुरू असून फलक हटविण्यात येत आहेत. अनधिकृत फलक लावणा-यांच्या विरोधात गुन्हेही दाखल केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. नगर शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फलक उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरच फलक उभारल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय अनधिकृत फलक लावल्याने महापालिकेच्या महसुल बुडत आहे.