सावेडी उपनगरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 15:50 IST2019-02-07T15:50:17+5:302019-02-07T15:50:25+5:30
सावेडी उपनगर परिसरातील गुलमोहर रोडवर वादग्रस्त असलेल्या जागेत बेकायदेशीरपणेपत्र्याची शेड टाकून दुकाने उभारणा-या 17 दुकानावर महापालिकेने आज कारवाई केली आहे.

सावेडी उपनगरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा
अहमदनगर : सावेडी उपनगर परिसरातील गुलमोहर रोडवर वादग्रस्त असलेल्या जागेत बेकायदेशीरपणेपत्र्याची शेड टाकून दुकाने उभारणा-या 17 दुकानावर महापालिकेने आज कारवाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाईस विलंब झाल्यामुळे महापालिकेविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिकाही झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. दरम्यान अनेक वर्षांपासून या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ समोरील सर्व दुकाने काढण्यात आली आहेत.