महापालिका पोटनिवडणूक: पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री

By Admin | Updated: December 15, 2015 23:13 IST2015-12-15T22:57:57+5:302015-12-15T23:13:16+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज वितरीत करण्याच्या पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री झाली.

Municipal Corporation Bye-Election: On the first day, the sale of 21 applications | महापालिका पोटनिवडणूक: पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री

महापालिका पोटनिवडणूक: पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री

अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग ११ व १५ मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज वितरीत करण्याच्या पहिल्याच दिवशी २१ अर्जांची विक्री झाली. प्रभाग ११ मध्ये इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी देताना पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रभाग ११ मधील नगरसेवक अजिंक्य बोरकर अपात्र ठरल्यानंतर प्रभागात निवडणूक होत आहे. अशोक दहिफळे, योगीराज गाडे यांच्यात सेनेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज आज घेतले. भाजपकडून पक्षाच्या महिला पदाधिकारी संगीता खरमाळे यांचे चिरंजीव सुजित रत्नाकर खरमाळे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. खरमाळे यांच्या अर्जामुळे भाजप-सेनेची युती होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच प्रभागात अपक्ष नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके यांचे चिरंजीव चंद्रकांत सूर्यभान शेळके यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपात्र ठरलेल्या बोरकर यांच्याच कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. प्रभाग १५ मध्ये सना सय्यद, जयश्री सुनील क्षेत्रे, कोमल नाना साबळे या तिघांनी ८ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या प्रभागाच्या नगरसेविका अनिता भोसले या अपात्र ठरल्यामुळे या प्रभागाची पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती २२ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अर्ज विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू केल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते.
(प्रतिनिधी)

Web Title: Municipal Corporation Bye-Election: On the first day, the sale of 21 applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.