शिल्पकृतीद्वारे मुंडेंना आदरांजली
By Admin | Updated: June 8, 2014 00:35 IST2014-06-07T23:42:05+5:302014-06-08T00:35:32+5:30
अहमदनगर : येथील प्रसिद्ध शिल्पकार-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी येथील महावीर कलादालनामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे शाडू मातीपासून दोन फूट उंचीचे
शिल्पकृतीद्वारे मुंडेंना आदरांजली
अहमदनगर : येथील प्रसिद्ध शिल्पकार-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी येथील महावीर कलादालनामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे शाडू मातीपासून दोन फूट उंचीचे अर्धाकृती शिल्प साकारून मुंडे यांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली.
गोपीनाथ मुंडे हे कलावंतामध्ये अत्यंत प्रिय असणारे व्यक्तिमत्व होते. कलावंत हा अधिक संवेदनशील असतो आणि तो त्याच्या भाव-भावना आपल्या कलेद्वारे व्यक्त करीत असतो. मुंडे यांच्या निधनानंतर शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यातील कलावंत अस्वस्थ होता. मुंडे यांच्याप्रती त्यांना नितांत आदर होता. मुंडे यांच्या प्रत्यक्ष भेटीचा दोन तीन वेळा योग आला, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याशी निवांत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांना विविध कला व कलावंतांबद्दल विशेष आवड व प्रेम होते. त्यामुळे आपल्या शिल्पकृतीद्वारे त्यांना आदरांजली वाहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ७ जून रोजी येथील महावीर कलादालनामध्ये त्यांनी अवघ्या काही मिनिटात मुंडे यांचे शिल्प साकारले आणि उपस्थित प्रेक्षकही मुंडे यांचे हुबेहूब शिल्प पाहून अवाक् झाले. ‘कला जगत’ अॅकॅडमी आॅफ फाईन आर्टस्च्या वतीने सुरू असलेल्या शिबिरात सहभागी शिबिरार्थी व त्यांचे पालक आज मोठ्या संख्येने महावीर कलादालनात उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुंडे यांचे शिल्प प्रमोद कांबळे यांनी साकारले. (प्रतिनिधी)