अतिक्रमण हटविणाºया अधिकाºयाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 19:58 IST2017-08-21T19:58:51+5:302017-08-21T19:58:51+5:30
महापालिका कर्मचाºयांचे आंदोलन : व्हीडिओ शुटिंग पाहून गुन्हा दाखल करणार

अतिक्रमण हटविणाºया अधिकाºयाला धक्काबुक्की
अ हमदनगर : प्रेमदान चौकातील रुग्णालयाचे अनाधिकृत बांधकाम पाडताना महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांना काही तरुणांनी शिविगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर कामगार युनियनने अधिकारी व कर्मचाºयांसह रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. व्हीडिओ शुटिंग तपासून गुन्हा दाखल करण्याचा आदेश आयुक्त घनश्याम मंगळे यांनी सायंकाळी युनियनसोबत झालेल्या बैठकीत दिला.उच्च न्यायालयाच्या आदेशाने आतापर्यंत १७ रुग्णालयांच्या पार्किंगमधील अनाधिकृत बांधकामावर हातोडा टाकला. पहिल्या टप्प्यातील ५२ रुग्णालयांवरील कारवाईचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. प्रेमदान चौकातील डॉ. प्रदीप तुपेरे यांचे नवजीवन सर्जिकल अॅण्ड क्लिनिक हॉस्पिटलच्या पार्किंगच्या जागेतील बाह्यरुग्ण विभाग आणि वेटिंग रुमवर अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी हातोडा टाकला. रुग्णालयाच्या बाहेरील अनाधिकृत भाग तोडत असतानाच तेथे काही तरुणांनी सुरेश इथापे व त्यांच्या सहकाºयांसोबत हुज्जत घातली. यावेळी इथापे यांना धक्काबुक्की व शिविगाळ झाली. एकाने इथापे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अन्य एका रुग्णालयावर कारवाईसाठी जातानाही इथापे व काही तरुणांचे वाद झाले.या घटनेनंतर काही क्षणातच तेथे कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे, विजय बोधे यांच्यासह अन्य कर्मचारी आले. त्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या दिला. यावेळीही लोखंडे व तेथे उपस्थित असलेल्या दोघे यांच्यात वाद झाले. डॉ. तुपेरे यांनीच गुंडांकडून इथापे यांना शिविगाळ, धक्काबुक्की केली. त्यामुळे डॉ. तुपेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करून लोखंडे यांनी रुग्णालयाच्या दारातच ठिय्या दिला. या आंदोलनात नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे, कल्याण बल्लाळ आदी सहभागी झाले. मारहाण करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, डॉ. तुपेरे यांचा वैद्यकीय परवाना तत्काळ रद्द करावा, पोलिस बंदोबस्त दिल्याशिवाय अतिक्रमणविरोधी कारवाई होणार नाही, असा निर्धार लोखंडे यांनी केला. त्यानंतर आयुक्त घनश्याम मंगळे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी कामगारांशी चर्चा केली. दुपारी साडेचारवाजता बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी सुरू केलेले रुग्णालयासमोरील आंदोलन मागे घेतले. ----------------