‘मुळा-प्रवरा’ने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:14+5:302021-04-30T04:25:14+5:30
अध्यक्ष खा. डॉ. विखे यांनी विळद घाट येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच शिर्डी येथे प्रकल्प ...

‘मुळा-प्रवरा’ने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा
अध्यक्ष खा. डॉ. विखे यांनी विळद घाट येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच शिर्डी येथे प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, राहुरीतील गावांसाठी मुळा प्रवरा संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे. संस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षी करोना काळात कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी अन्नछत्र सुरू केले होते.
मात्र, आता ऑक्सिजन बेडचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना नगर, औरंगाबाद, पुणे अथवा नाशिक जिल्ह्यात हलवावे लागत आहे. त्यात नातेवाइकांची मोठी दमछाक होते आहे. कार्यक्षेत्रातील संस्थेच्या सभासदांसाठी प्रकल्प उभारल्यास रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करता येईल. संस्थेच्या जागेत शक्य नसल्यास अन्य जागांचा पर्याय उपलब्ध करता येईल. यामुळे सभासदांना दिलासा देणारा निर्णय अध्यक्ष खा. डॉ. विखे यांनी घ्यावा, असे आवाहन संचालक छल्लारे यांनी केले आहे.