आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:37 IST2017-09-12T22:26:35+5:302017-09-12T22:37:52+5:30
अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम
अ मदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण राज्यात व नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची दररोज अंमलबजावणी होत आहे. सुरूवातीला ई, एफ, जी या गटात होणारे भारनियमन मंगळवारी डी व सी गटांतील फिडरवरही काही प्रमाणात झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने विजेशिवाय लोक घरात बसू शकत नाहीत. त्यामुळे तातडीने भारनियमन रद्द करण्याची मागणी करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे आदींसह १०० ते २०० कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणने वसुलीनुसार शहराची ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अशी विभागणी केली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी आहे. तसेच चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. अपेक्षित बिल वसुली होत नसल्याने तसेच गळती वाढल्याने अनेक फिडर ई, एफ, जी या गटात गेले आहेत. त्यामुळे तेथे तातडीचे भारनियमन करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक आणखीच भडकले. जे ग्राहक वीजबिल भरत नाहीत, ज्यांच्यामुळे थकबाकी वाढली अशांवर महावितरणने कारवाई करावी, त्याचा भुर्दंडसंपूर्ण शहराने का सोसायचा. जो बिल भरतो, त्याला वीज मिळालीच पाहिजे, जोपर्यंत भारनियमन रद्द होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्यांसह इतर अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यालयातील दिवे बंद करून कार्यकर्त्यानी ठिय्या दिला. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते.आंदोलकांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. उद्यापासून वसुलीत सुधारणा करू. तसेच १४ सप्टेंबरपासून भारनियमन बंद करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -----------फोटो-साजीदलिस्टतातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.