शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर वसतिगृहाची अवस्था पाहून खासदार संतापले; अस्वच्छता, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:49 IST

खानापूर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट दिली.  येथील अस्वच्छता पाहून लोखंडे प्रशासनावर चांगलेच संतापले.

अकोले : खानापूर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहास खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट दिली.  येथील अस्वच्छता पाहून लोखंडे प्रशासनावर चांगलेच संतापले.अस्वच्छता, उघड्या तुंबलेल्या गटारी, स्वच्छतागृहांची दुर्दशा, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके आणि रिकामी पाकिटे, गुटक्याच्या रिकाम्या पुड्या असा वसतिगृहाचा झालेला ‘उर्किडा’ पाहून संताप व्यक्त केला. तात्त्काळ खासदारांनी आदिवासी आयुक्तांना फोनवरुन येथील अस्वच्छतेची माहिती दिली. अधीक्षक व सफाई कामगारांना निलंबित करण्याची सूचना केली. वसतिगृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त मुले येथे आहेत. वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. ड्रेनेजची सोय नाही, पाणी खराब असून त्यामुळे अंगावर पुरळ उठते अशी कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली. वसतिगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून अधीक्षक, सफाई कामगार व अन्य कर्मचारी येथे कधीच दिसत नाहीत अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बेसीनचे तुटलेले नळ, स्वच्छता गृहाची तुटलेली दारे पाहून खासदार यांनी संताप व्यक्त केला.  सरकार पैसे खर्च करते ते, जातात कुठे? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला. मच्छिंद्र धुमाळ, महेश देशमुख, महेश नवले, प्रदीप हासे उपस्थित होते.वसतिगृहाची क्षमता १२५च्या दरम्यान आहे. त्यात जवळपास २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.

अधीक्षक व दोन सफाई कामगार तेथे असतात. ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. गटार व ड्रेनेजच्या कामासाठी २० लाख रुपयांचे काम मंजूर असून सार्वजनिक बांधकामाकडून हे काम सुरु आहे, असे राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे  ठुबे, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेEducationशिक्षणStudentविद्यार्थी