शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 20:00 IST

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

Supriya Sule ( Marathi News ) : शिर्डी (जि. अहमदनगर) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबीर होत आहे. आज या शिबीराचा शेवटचा दिवस होता, राज्यभरातून या शिबीरासाठी पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ना न घेता निशाणा साधला. "जे लोक दिल्ली वाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्यासोबत मी लढणार नाही, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल. माझ भाषण रेकॉर्ड करुन ठेवा. सत्तेवर आल्यानंतर पहिली सही ही अंगणवाडी सेविकांसाठी असेल. तसेच धनादेशावरील पहिली सही ही शेतकऱ्यांसाठी असेल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी धनादेशावर मुख्यमंत्री सही करेल. यावेळी खासदार सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

"जो गरीब असतो त्याच्याशी कधीच लढायचे नाही. लढायचे असेल तर आपल्यापेक्षा ताकदवर असतात त्यांच्याविरोधात लढायचे असते. त्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही. मी त्यांच्याशी लढणारही नाही. जे दिल्लीवाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्याशी काय लढायचे, लढायचे असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीशी लढा, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.  

सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार

मोदी सरकारला हटविण्यासाठी ठराविक कार्यक्रम इंडीया आघाडीच्या माध्यमातून राबवावे लागणार आहेत. वाढती बेरोजगार, महागाई,  आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन योग्य असे धोरण आम्ही ठरविणार आहोत. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना सांगणायचे आहे की, येत्या निवडणूकांमध्ये आपण सहकारी पक्षांना सोबत घेऊन सामाेरे जाणार आहोत. एकट्याने जाणार नाहीत.  

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जी आव्हाणे आहेत, त्यातून असे दिसते जनमानसातून पर्याय दिला पाहिजे, नक्कीच त्यास जनतेचा पाठींबा मिळेल. त्या कामाला तुम्ही तयार रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पदाधिकाऱ्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या शिबिरात शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  विचारधारेला महत्त्व देण्याचे काम देशात सुरू आहे. हिंदूत्वावर आधारीत फॅसीझम त्यांना आणायचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हातात घेतला आहे. सर्वक्षेत्रात खासगीकरण, नफेखोरीला प्राेत्साहन, मुस्लिम समाजाविरूध्द द्वेश वाढवणे, स्वायत्त संस्थांवर कब्जा ठेवणे, मनुवादी वर्चस्ववाद वाढविणे, धर्माच्या नावाखाली पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखविणे अशा मुद्द्यातून भारतीय जनता पक्ष जनतेसमोर वेगळे वातावरण तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार