खासदार दिलीप गांधींची फसवणूक : फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:46 IST2018-03-04T20:15:58+5:302018-03-04T20:46:36+5:30
फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्रायवेट लिमिटेडचे मालक व कर्मचा-यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासदार दिलीप गांधींची फसवणूक : फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा
अहमदनगर : फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्रायवेट लिमिटेडचे मालक व कर्मचा-यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा, नगरच्या शोरूमचे मालक भूषण बिहाणी, गोवर्धन बिहाणी, अभिषेक बिहाणी, कर्मचारी सुशील ओसवाल, अजय रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी खासदार दिलीप गांधी व नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि इतरांविरोधात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.