शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:48 IST

जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : महावितरण कंपनीने वीज पंपांची वीज तोडण्याची कारवाई सुरु केल्यानंतर जिल्हाभरात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्यात सुरु झालेल्या आंदोलनांची धार कायम असून, सोमवारीही जिल्हा आंदोलनांनी दणाणून निघाला.जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी व काँगे्रसच्या वतीने महावितरणच्या अधिका-यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, सिद्धार्थ मुरकुटे, बाळासाहेब पटारे, नगरसेवक राजेंद्र पवार, केतन खोरे, लकी सेठी, अशोक बागुल आदींनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला.कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या नेतृत्वाखाली महावितणविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, अ‍ॅड़ सुरेश शिंदे, बाळासाहेब सपकाळ, गजेंद्र यादव, स्वप्निल तनपुरे, अण्णासाहेब मोरे, दत्ता पोटरे आदी उपस्थित होते.या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. पिके जोमात आहेत. मात्र महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे पिके कोमात जाण्याची वेळ आली आहे. बहुतेक रोहीत्र महावितरणच्या अधिका-यांनी वसुलीचे कारण दाखवून बंद केली आहेत. यामुळे शेतातील पिके सुकू लागली आहेत. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तुम्ही अगोदर विज बिले भरा, मगच वीज पुरवठा सुरू होईल, अशी भूमिका महावितरणच्या अधिका-यांनी घेतली आहे. त्यामुळे पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे वीज पुरवठा सुरु करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरीcongressकाँग्रेस