पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:01+5:302021-04-04T04:22:01+5:30
पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेने शनिवारी सकाळी आंदोलन केले. येथे नागरिकांनी ...

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन
पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेने शनिवारी सकाळी आंदोलन केले. येथे नागरिकांनी गैरसोय होत असल्याचाही आरोप केला.
मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे व तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी दोघांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानुसार अविनाश पालवे व संतोष जिरेसाळ हे शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात गेले. तेथे कोरोना रुग्णांच्या नोंदणीसाठी एकच टेबल उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना काही तास रांगेत उभे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. ही परिस्थिती पाहून पालवे व जिरेसाळ हे डॉ. अशोक कराळे यांच्याकडे गेले. यावेळी डॉ. कराळे व पालवे व जिरेसाळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप व त्यांच्या सहकार्याने मध्यस्थी करत वाद मिटविला.
---
०३पाथर्डी आंदोलन
पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.