माऊस, पेन ड्राईव्ह, सीसीटीव्ही कॅमेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:37+5:302021-01-04T04:18:37+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. सोमवारी (दि. ४) म्हणजे आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप ...

माऊस, पेन ड्राईव्ह, सीसीटीव्ही कॅमेरा
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. सोमवारी (दि. ४) म्हणजे आज उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास दोनशे चिन्ह निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामध्ये संगणकाचा माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेरा, बिस्कीट, भाजीपालांच्या चिन्हांचा समावेश आहे. आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डाेळा राहणार आहे. चिन्हांसाठी आज चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. ७ हजार १३४ जागांसाठी २३ हजार अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवांराना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वाची असली, तरी त्यांना त्यांची अधिकृत चिन्हे वापरता येत नाहीत. निवडणूक आयाेगाने नव्याने ४० चिन्हांचा समावेश केला आहे. त्यामुळे चिन्हांची संख्या १९० वर पाेहोचली आहे.
----
अशी आहेत चिन्हे
टीव्ही, कपाट, रिक्षा, सफरचंद, एसी, टाेपली, बॅट, विजेरी (टॉर्च), मण्यांचा हार, पट्टा, दुर्बीण, फळा, हाेडी, पुस्तक, पेटी, पाव, ब्रश, बादली, बस, गणक यंत्र, कॅमेरा, कॅन, मेणबत्ती, खटारा, फॅन, साखळी, काेट, नारळाची बाग, नारळ, कंगवा, क्रेन, कपबशी, हिरा, ड्रील मशीन, डंबेल्स, विजेचे खांब, बासरी, फुटबाल, ऊस, गॅस सिलिंडर, काचेचा पेला, चष्मा, द्राक्ष, हेडफाेन, हिटर, इस्त्री, फणस, जग, किटली, चावी, कडी, पत्रपेटी, लाईटर, ल्युडाे, जेवणाचा डबा, मका, काडेपेटी, माईक, मिक्सर, नगारा, टाय, कढई, वाटाणे, कंपासपेटी, पेन्सिल शार्पनर, उशीसह अन्य चिन्हांचा समावेश आहे.
---------
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
एका ग्रामपंचायतीसाठी संबंधित उमेदवाराला चिन्ह मिळाले, तर ते दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अन्य पॅनेलच्या उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना त्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी चिन्ह वापरावे लागणार आहे. म्हणजेच एकाच पॅनेलमधील उमेदवारांना विविध चिन्हावर लढावे लागणार आहे.
-------------
पेनड्राइव्ह, बिस्कीट, सीसटीव्ही, माउस या नवीन चिन्हांची पडली भर
निवडणूक आयाेगाने नव्याने काही चिन्हं दिली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरा, बिस्कीट, पेनड्राइव्ह, माउस, फलंदाज, टाेस्टर, सिमला मिरची, आक्राेड, भेंडी, टाेस्टर, कर्णफुले, चार्जर, बडे केक, फुगा, पांगुळगाडा, हवा भरण्याचा पंप, पोळपाट, लालटेन, आइसस्क्रीम, हिरवी मिरची, काटा,नरसाळे, हातगाडी, हार्माेनियम, हेलीकाॅप्टर, हेल्मेट, हाॅकी, वाळूचे घड्याळ, पाणी गरम करण्याचा हिटर आदी चिन्हांचा समावेश आहे.
-----
उमेदवार नवीन चिन्हांची मागणी करतात. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून अशा चिन्हांची नोंद घेतली जाते. त्यानुसार नवीन चिन्हांची भर पडली आहे. त्यामुळे चिन्हांची संख्या दोनशेच्या आसपास आहे.
-उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी
--------------
डमी- ०१इलेक्शन सिब्माल डमी
फोटो- नेट फोटोत त्या त्या नावाने