मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:14+5:302021-08-19T04:26:14+5:30
-------------- नेप्ती शिवारात दुचाकीची चोरी अहमदनगर : नगर तालुक्यातील नेप्ती शिवारातून मोटारसायकलची चोरी झाली. याप्रकरणी हनमंत लिंबाजी रोडे (रा. ...

मोटारसायकलची चोरी
--------------
नेप्ती शिवारात दुचाकीची चोरी
अहमदनगर : नगर तालुक्यातील नेप्ती शिवारातून मोटारसायकलची चोरी झाली. याप्रकरणी हनमंत लिंबाजी रोडे (रा. केडगाव) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १६ ऑगस्ट रोजी १२ वाजण्याच्या सुमारास रोडे यांची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच ४५ एपी ०१९३) आरोपी सौंदागर सुरेश शिंदे (रा. शेरी, ता. आष्टी) याने चोरून नेली.
-----------
राहुरीत जबरी चोरी
अहमदनगर : नगर - मनमाड रोडवर गुहा गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांना लुटून मोबाईल व मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी दाऊद मुश्ताक शेख (रा. देवळाली, प्रवरा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १६ ॲागस्ट रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शेख व त्यांचा मित्र नगर - मनमाड रोडने जात असताना गुहा (रा. राहुरी) गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत मित्राचा मोबाईल व पल्सर मोटारसायकल चोरून नेली.
---------------
ज्योतिबाचीवाडी येथे चोरी
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी येथे घरात घुसून चोरट्यांनी ३८ हजार ५०० रुपयांची चोरी केली. याप्रकरणी काकासाहेब हरिभाऊ कांळगे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २ या वेळेत अज्ञात चोरट्याने काकासाहेब यांच्या उघड्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ३८ हजार ५०० रुपये चोरून नेले.