मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:52+5:302021-02-05T06:38:52+5:30
मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्या अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथून चोरट्यांनी मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या आणि केबल असा एकूण ११ ...

मोटारसायकलची चोरी
मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्या
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथून चोरट्यांनी मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या आणि केबल असा एकूण ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ३१ जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी संदीप संतोष बच्छाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक घुगे हे पुढील तपास करत आहेत.
४२ हजार रुपये चोरले
अहमदनगर : शिर्डी येथील साइश कॉर्नर येथून चोरट्याने धूमस्टाईलने तरुणाचे ४२ हजार रुपये धूमस्टाईलने चोरून नेले. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात आश्विनकुमार दत्तात्रय गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गडाख हे पुढील तपास करत आहेत.
विहिरीतील वीजपंप चोरले
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरट्याने ५ हजार रुपये किमतीचे वीजपंप चोरून नेले. ३१ जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गोकुळ काकासाहेब घोरतळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून दागिने चोरले
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे चोरट्याने घरातून ११ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. १ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी स्वप्निल दादाभाऊ ढोरमले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आडकिले हे पुढील तपास करत आहेत.