शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घडना; तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या, नगर जिल्हा हळहळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 21:33 IST

संगमनेर तालुक्यातील घटना : विहिरीत घेतली उडी

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा (कोठे खुर्द) येथील स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (वय ५), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय ३) आणि शिवम बाळासाहेब ढोकरे (वय ४ महिने) अशी मृत मुलांची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा येथे बाळासाहेब ढोकरे हे आई, वडील, पत्नी, मुलांसह राहतात. कुटुंबासमवेत शेती व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी बाळासाहेब हे आईसोबत लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांचे वडील गणपत ढोकरे हे शेतात खुरपणीचे काम करत होते. स्वाती व तीन मुले घरीच होते. दुपारच्या वेळी गणपत ढोकरे हे जेवणासाठी शेतातून घरी आले. घरी कोणीही दिसेना म्हणून त्यांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. घरालगतच्या विहिरीजवळ त्यांची सून स्वाती यांची चप्पल त्यांना दिसली. गणपत ढोकरे यांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना सुनेसह तीनही नातवांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.

याबाबत गणपत ढोकरे यांनी पोलीस पाटील दत्तात्रय ढोकरे यांना कळविले. पोलीस पाटील ढोकरे यांनी घारगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी मच्छिंद्र खांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यूPoliceपोलिसWomenमहिला