शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आई, वडिलांच्या साक्षीने घरातच विवाहबद्ध; व-हाडी मंडळींनी टाकल्या आॅनलाईन अक्षदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:20 IST

एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार  विद्यार्थ्यांची दोन टाईमाची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.

बाळासाहेब काकडे/

श्रीगोंदा : एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार  विद्यार्थ्यांची दोन टाईमाची भूक भागविण्यासाठी देण्यात येणार आहे.या आगळ्या वेगळ्या विवाहाचे फेसबुक यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. व-हाडी मंडळींनी या लाडक्या जोडीवर घरात बसून आॅनलाईन  अक्षदा टाकल्या. हा विवाह सोमवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथे पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील  वसंतराव निंभोरे  यांचे चिरंजीव किरण  तर येळपणे येथील वाल्मिक डफळ यांची कन्या राणी यांचा सहा महिन्यापूर्वी विवाह निश्चित झाला होता. २७ एप्रिल २०२० हा विवाहाचा मुहूर्त काढण्यात आला होता. किरण हा एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. तर राणी ही मनमाड येथे पीएसआय आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे झाली अडचण मात्र वधू-वरांनी  फक्त आई, वडिलांच्या उपस्थितीत  सोशल डिस्टसिंगचे व नियमाचे तंतोतंत पालन केले. परिसर  सॅनेटाईज करण्यात आला होता. यावेळी सुमारे १ हजार ५०० चाहत्यांनी आपआपल्या घरी बसून या जोडीला आॅनलाईन शुभेच्छा दिल्या. विवाह करा पण.. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रत्येकांने संचारबंदीचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र कोणताही डामडौल न करता आपल्या घरातच  विवाहबद्ध होऊ शकता.आम्ही लग्नाचा वाचलेला भोजन खर्च पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांच्या भोजनावर करणार आहे. -किरण निंभोरे, राणी डफळ, वधू-वर.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइन