‘सासू-सुनेची जोडी नंबर वन’
By Admin | Updated: June 24, 2014 00:03 IST2014-06-23T23:37:38+5:302014-06-24T00:03:36+5:30
लोकमत सखी मंच: अभिनेत्री ॠजुता देशमुख यांना भेटण्याची संधी
‘सासू-सुनेची जोडी नंबर वन’
अहमदनगर : प्रश्न हा अनंतकाळचा, कोण सरस, सासू की सून? ... सोडून चर्चा सारी... करुया जोडी... घेऊ जग जिंकून असे म्हणत ‘सासू-सूनेची जोडी नं. १’ ही आगळी वेगळी स्पर्धा खास लोकमत सखी मंच सदस्यांकरिता आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दि. २८ जून २०१४ रोजी सायं. ५ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड येथे ही अनोखी स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा सर्व महिलांकरिता खुली असून स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता सासू-सूनेची जोडी असणे आवश्यक आहे. या मनोरंजनात्मक स्पर्धेत परिचय फेरी आणि एक मिनीट गेम शो अशा फेऱ्या होणार आहेत. स्वपरिचय फेरीमध्ये सासूने सूनेचा व सूनेने सासूचा परिचय प्रत्येकी एक मिनीटात करुन द्यायचा आहे. तसेच या फेरीसाठी दोघींनी मॅचिंग वेशभूषा करावी. गेम शो फेरीमध्ये दोघींनी मिळून गेम्स खेळावयाचे आहेत.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेण्याकरिता लोकमत भवन, सावेडी रोड येथे ९८५०२६४२००, २४२९९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या कार्यक्रमाकरिता वामन हरी पेठे ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक असून साईदिप ग्रुप यांचे सौजन्य या कार्यक्रमाकरिता मिळाले.
(प्रतिनिधी)