दोन लहान मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, नगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:52 IST2018-03-22T21:48:08+5:302018-03-23T10:52:17+5:30
दोन वर्षांच्या पोटच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आईनं स्वत: आत्महत्या केली. मात्र विष शिल्लक न राहिल्याने सहा महिन्यांची मुलगी बचावली. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड गावात आज दुपारच्या सुमारास घडली.

दोन लहान मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, नगरमधील घटना
श्रीगोंदा : दोन वर्षांच्या पोटच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आईनं स्वत: आत्महत्या केली. मात्र विष शिल्लक न राहिल्याने सहा महिन्यांची मुलगी बचावली. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड गावात आज दुपारच्या सुमारास घडली.
या गावातील २८ वर्षीय श्यामल यरकळ या विवाहितेने हे कठोर पाऊल उचलले.
आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास श्यामल हिने दोन्ही मुलींना घरात बोलावून घेतले. अगोदर स्वत: विष प्राशन केले. त्यानंतर दोन वर्षीय आराध्याला औषध पाजले. त्यानंतर सहा महिन्यांच्या मुलीलाही तिने औषध पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र औषध संपल्याने ती बचावली. श्यामलचा जागीच मृत्यू झाला, तर आराध्याचा उपचार सुरुअसताना मृत्यू झाला.
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथे यरकळ कुटुंबीय वास्तव्यास आहे. आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. घटनेची माहीती कळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.