शहरातील दोनशेहून अधिक विहिरी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:58+5:302021-09-02T04:46:58+5:30
अहमदनगर : एकेकाळी शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा नालेगाव भागात अडीचशेहून अधिक विहिरी होत्या. दुष्काळात या विहिरीतूनच नगरकरांना पिण्याचे पाणी ...

शहरातील दोनशेहून अधिक विहिरी गायब
अहमदनगर : एकेकाळी शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा नालेगाव भागात अडीचशेहून अधिक विहिरी होत्या. दुष्काळात या विहिरीतूनच नगरकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत होते. परंतु, काळानुसार शहरातील नागरी शहरातील नागरी वस्ती वाढली आणि दोनशेहून अधिक विहिरी गायब झाल्या आहेत.
नगर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. शहरातील दिल्लीगेट ते माळीवाडा, नालेगाव, नवीपेठ, गुजरगल्ली आदी भागात २७० विहिरी होत्या. सन १९५२ मधील दुष्काळात या विहिरींचा वापर केला गेला. नागरिक सायकलवरून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करत होते. तसेच १९७२ च्या दुष्काळातही विहिरी उपलब्ध होत्या. बाळाजीबुवा विहिरीत सहा बैलांची मोट चालत होती. नागरिक सायकलवरून पिण्याचे पाणी घेऊन जात होते. पुरातन विहिरींमुळे दुष्काळातही नगरकरांना पाणी उपलब्ध झाले. परंतु, काळानुसार बदल होऊन पाणी योजना आली. पाणी योजनेद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे विहिरींचा वापर कमी झाला.
....
गणेश विसर्जनासाठी चार विहिरींचे संवर्धन
गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून नालेगाव येथील बाळाजीबुवा, यशोदानगर, केडगाव आणि औरंगाबाद रोडवरील विहिरींची दरवर्षी स्वच्छता केली जाते. इतर वेळी कचरा, गवत आदींनी विहिरी भरलेल्या असतात. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
....
२७० विहिरींची नाेंद
शहरातील जुन्या २७० विहिरींची शासन दप्तरी नोंद आहे. यापैकी चारच विहिरी अस्तित्वात आहेत. या विहिरींचा वापर गणेश विसर्जनासाठी केला जात असून, त्या बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत.
....
शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा, नालेगाव आदी भागांत २७० विहिरी होत्या. या विहिरींची शासन दप्तरी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दोनशेहून अधिक विहिरी गायब आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे.
- शशिकांत चंगेडे, ज्येष्ठ माहिती अधिकारी कार्यकर्ते
...
सूचना डमी क्रमांक- १११२
..
सूचना फोटो: ०१ महापालिका नावाने आहे.