शेवगावच्या ७९ गावांची आणेवारी ६० पैशांहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:15+5:302021-02-05T06:34:15+5:30

शेवगाव : तालुक्यातील ७९ गावांच्या रब्बी पिकांची हंगामी सुधारीत आणेवारी ६० पैशांच्या पुढे लावण्यात आली आहे. बदलत्या वातावरणाने ...

More than 60 paise in November of 79 villages of Shevgaon | शेवगावच्या ७९ गावांची आणेवारी ६० पैशांहून अधिक

शेवगावच्या ७९ गावांची आणेवारी ६० पैशांहून अधिक

शेवगाव : तालुक्यातील ७९ गावांच्या रब्बी पिकांची हंगामी सुधारीत आणेवारी ६० पैशांच्या पुढे लावण्यात आली आहे. बदलत्या वातावरणाने ज्वारी, गहू, हरबरा, कांदा पिकावर झालेला विपरीत परिणाम पाहता ही आणेवारी आचंबित करणारी ठरत आहे.

शेवगाव तालुक्यातील २०२०-२०२१ सालाची ६५ ग्रामपंचायतींतील ७९ गावांच्या रब्बी पिकांची सुधारित आणेवारी प्रशासनाने ६० पैशांहून अधिक जाहीर केली आहे. शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, भातुकडगाव मंडळाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही आणेवारी जाहीर केली आहे.

गायब असलेली थंडी, सततचे ढवाळ हवामान याचा रब्बी पिकांवर काही परिणाम झाला की नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. सुधारित आणेवारी अशी : आपेगाव ( ५८ ). आखतवाडे (६१). मलकापूर, चापडगाव, ढोरजळगावने, सोनविहीर (६३). अंत्रे, भावीनिमगाव, बक्तरपूर, भायगाव, ढोरसडे, देवटाकळी, मजलेशहर, सुलतानपूर बुद्रूक (६४). शहापूर, बऱ्हाणपूर (६५). बालमटाकळी, गायकवाड जळगाव, लोळेगाव (६६). आव्हाणे खुर्द, खामपिंप्री, मेळगाव, नांदुरविहिरे, पिंगेवाडी, वडुले खुर्द, वडुले बुद्रूक (६७). आव्हाणे बुद्रूक, आंतरवाली खुर्दने, बोडखे, भातकुडगाव, दादेगाव, दहिफळ, दहिगावशे, ढोरहिंगणी, देवळाणे, एरंडगाव, गदेवाडी, गरडवाडी, घेवरी, हातगाव, हिंगणगावने, खरडगाव, कऱ्हेटाकळी, खडके, खामगाव, लखमापुरी, मडके, मुंगी, निंबे, प्रभुवाडगाव, सामनगाव, तळणी, ठाकूर पिंपळगाव, ताजनापूर, वाघोली, विजयपूर, रांजणी, रावतळे (६८). घोटण, खुंटेफळ, कांबी, खानापूर, कर्जत खुर्द, कुरुडगाव, लाखेफळ, शहरटाकळी (६९). भगूर, आखेगाव ति., डो. आखेगाव, दहिगावने, जोहरापूर, मुरशतपूर, सुलतानपुर खुर्द, शहाजापूर (७०). अमरापूर, शेवगाव, वरूर बुद्रूक, वरूर खुर्द (७१). ढोरजळगावशे (७२).

Web Title: More than 60 paise in November of 79 villages of Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.