दुपारी २ वाजेदरम्यान शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील नगर- मनमाड रोड, नवी पेठ, स्टेशन रोडने मोर्चा तहसील कार्यलयासमोर धडकला. बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी. राहुरी तालुक्यातील खडांबे येथील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे. अहमदनगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा किमान वेतन मिळावे. गॅस सिलिंडरवरील बंद केलेली सबसिडी चालू करावी. पेट्रोल- डिझेलचे वाढलेले दर कमी करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र मुख्य संघटक दीपक भालेराव, जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल, जिल्हा उपाध्यक्ष सतीश चक्रे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ऋषिकेश पोळ, तालुकाध्यक्ष सनीभाऊ काकडे, तालुका कार्याध्यक्ष योगेश उराडे, गुलशन बिवाल, श्याम जाधव, अरुण पवार, किरण माळी, सचिन जगधने, बबन जगधने, शुभम बिवाल, विनोद साबळे, सचिन लोखंडे उपस्थित होते.