घरेलू कामगार महिलांचा संगमनेरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:04+5:302021-07-14T04:25:04+5:30
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष विकास डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेच्या महिला शहरप्रमुख सविता दिघे, ...

घरेलू कामगार महिलांचा संगमनेरात मोर्चा
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष विकास डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेच्या महिला शहरप्रमुख सविता दिघे, सचिव लक्ष्मी कोक्का, उपतालुका प्रमुख अपेक्षा नरवडे, उपजिल्हाध्यक्ष विशाल बर्डे, संघटक प्रशांत बर्डे, संगमनेर तालुकाध्यक्ष विशाल माळी, शहरप्रमुख मुकेश नरवडे, उपशहर प्रमुख प्रशीक जगताप यांसह सविता भालेराव, राणी शिरोळकर, लक्ष्मी सुरभैया, सोनाली तळेकर, रिना सारोळे, लक्ष्मी श्रीगादी, शर्मिला पठाण, रेश्मा पठाण, अंकुश पवार, संतोष पवार, अंबादास मोरे, विजय माळी, दिलीप निकम, अविनाश दळवी, चंद्रकांत शिंदे, नितीन गवळी, संदीप बर्डे, विकास शिंदे आदी सहभागी झाले होते. शहरातील रंगारगल्ली परिसरातून सुरू झालेला मोर्चा प्रांतकचेरीवर नेण्यात आला. त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संगमनेर शहर आणि तालुक्यातील घरेलू कामगार महिलांची नोंदणी करावी, त्यांच्यासाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजनांची तरतूद केली आहे. त्याचा त्यांना लाभ मिळावा. अनेक महिला आजही भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाकडून त्यांना हक्काचे घरकुल मिळावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यामुळे घरभाडे, विजेचे बिल, घरपट्टी, पाणीपट्टी भरणे बाकी आहे. महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. वीज बील माफ करावे, घरेलू कामगार महिलांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.