हॉस्पिटलमधून पैसे मोबाइल चोरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:25+5:302020-12-16T04:36:25+5:30
----------- तवेरा कार चोरली अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथून चोरट्यांनी तवेरा कार चोरून नेली. ५ ते ६ ...

हॉस्पिटलमधून पैसे मोबाइल चोरला
-----------
तवेरा कार चोरली
अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथून चोरट्यांनी तवेरा कार चोरून नेली. ५ ते ६ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात महेश अंकुश अजबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल धुमाळ पुढील तपास करत आहेत.
--------------
अडीच लाख रुपये चोरले
अहमदनगर : शहरातील विद्युत वितरण कार्यालय परिसरात उभ्या केलेल्या गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी रोख अडीच लाख रुपये चोरून नेले. सोमवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गौस आमिर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार पुढील तपास करत आहेत.