अर्ज भरण्यासाठी सोमवारची डेडलाईन
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:37:09+5:302014-07-11T00:56:44+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील आठ नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा अखेरचा दिवस आहे़

अर्ज भरण्यासाठी सोमवारची डेडलाईन
अहमदनगर: जिल्ह्यातील आठ नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा अखेरचा दिवस आहे़ उपनगराध्यक्ष पदासाठी सभागृहात दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, पाथर्डी व कोपरगावच्या उपनगराध्यक्ष निवडीला स्थगिती देण्यात आली आहे़ उर्वरित सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडी होणार असल्याने राजकीय हलचालींना वेग आला आहे़
जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिका वगळता आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे़ त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहाता, पाथर्डी, देवळाली प्रवरा आणि संगमनेर नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रशासकाची नियुक्ती करत नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे़ निवडणूक कार्यक्रमाची माहिती नगरपालिकांना देण्यात आली असून, येत्या १८ जुलै रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बोट वर करून सभागृहात निवडणूक होणार आहे़ नगराध्यक्षपदासाठी १४ जुलै दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे़ नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करावेत़ प्राप्त अर्जाची मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छाननी होणार असून, अर्ज माघारीसाठी १७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
पीठासीन अधिकारी
सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात येत असून, निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे़