विद्यार्थिनीचा विनयभंग ; अधीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:38 IST2019-03-30T18:36:28+5:302019-03-30T18:38:10+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यास अटक करण्यात आली आहे.

विद्यार्थिनीचा विनयभंग ; अधीक्षकाला अटक
अहमदनगर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील सारडा महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अशोक असेरी यास अटक करण्यात आली आहे. आज सकाळी तोफखाना पोलिसांनी कारवाई केली.
हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक असेरी यांनी महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेल मध्ये राहणा-या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सदर विद्यार्थिनीच्या फियार्दीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात असेरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून असेरी यास अटक करण्यात आली आहे.