प्रेमास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: August 13, 2015 23:10 IST2015-08-13T22:57:39+5:302015-08-13T23:10:10+5:30

श्रीरामपूर : प्रेमास नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग करण्यात आला.

Molestation of a girl who refuses love | प्रेमास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग

प्रेमास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग

श्रीरामपूर : प्रेमास नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग करण्यात आला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली. चौथा आरोपी फरार झाला. अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन आरोपीने त्याच्या तीन मित्रांसमवेत या मुलीचे घर गाठले. घरात घुसून तिचे कपडे फाडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तिच्या मदतीसाठी आलेला तिचा भाऊ, आई, वडील व चुलते यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आमच्याविरूद्ध पोलिसात फिर्याद दिल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही देण्यात आली. बुधवारी शहराच्या प्रभाग २ मध्ये हा प्रकार घडला. तिच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे यांच्याकडे तक्रार केली़ पोलिसांनी मोहसीन उर्फ बुंदी इसहाक कुरेशी (वय २५), मोहसीन इस्माईल कुरेशी (वय २४), इम्रान इस्माईल कुरेशी (वय २९, सर्व राहणार प्रभाग २,श्रीरामपूर) यांना अटक केली. अमीन कादीर शेख (रा. मिल्लतनगर) हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of a girl who refuses love