नेवाशाचा मोहिनीराज यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:12+5:302021-02-15T04:20:12+5:30

नेवासा : शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे पंच कमिटी व पुजारी बडवे कुटुंबीयांनी जाहीर ...

Mohiniraj Yatra festival of Newasha canceled | नेवाशाचा मोहिनीराज यात्रोत्सव रद्द

नेवाशाचा मोहिनीराज यात्रोत्सव रद्द

नेवासा : शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे पंच कमिटी व पुजारी बडवे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे.

विष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव अर्धनारीनटेश्वर मोहिनीराजाचे मंदिर आहे. अनेकांचे कुलदैवत असल्याने यात्रेच्या पंधरा दिवसात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

२० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही यात्रा जाहीर भागवत कथा, कीर्तन, पालखी सोहळा, काला यासह पाच दिवसांचे गाव जेवण पंगती यासाठी प्रसिद्ध आहे. ४ मार्च रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी काला होणार होता.

या दरम्यान लाखो भाविक नेवाशात येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानचे पंच कमिटी व पुजारी बडवे यांनी यावर्षी यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीपासून मंदिरांमध्ये भागवत संस्कृत संहिता वाचली जाणार असून यावेळी मंदिरात समयांचा दीपोत्सव सात दिवस होईल.

त्यानंतर मोहिनीराज महाराजांची उत्सव मूर्ती पाच दिवसांसाठी पाक शाळेत जाण्याऐवजी मंदिरातच गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. पाच दिवसांनी पुन्हा एकदा विधिवत पूजा होऊन देव मूर्ती मूळ जागी विराजमान होणार आहे.

Web Title: Mohiniraj Yatra festival of Newasha canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.