मोदी,सिंघम ड्रेसची चलती
By Admin | Updated: October 18, 2014 23:47 IST2014-10-18T23:47:52+5:302014-10-18T23:47:52+5:30
अहमदनगर : दिवाळी आली की कपडे खरेदीचे वेध सर्वांनाच लागतात़ यावर्षी कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असून, लहान मुलांसाठी यावर्षी नव्यानेच मोदी ड्रेस बाजारात दाखल झाले आहेत़

मोदी,सिंघम ड्रेसची चलती
अहमदनगर : दिवाळी आली की कपडे खरेदीचे वेध सर्वांनाच लागतात़ यावर्षी कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असून, लहान मुलांसाठी यावर्षी नव्यानेच मोदी ड्रेस बाजारात दाखल झाले आहेत़ मोदी ड्रेस, सिंघम ड्रेस, राजनिती ड्रेसला बालकांकडून मोठी मागणी असल्याचे विके्रते सांगतात़ यावर्षी कापड खरेदी-विक्रीतून दहा कोटीपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता आहे़
दिवाळीत कापड खरेदी मोठ्या प्रमाणावर होते़ शहरात २०० हून अधिक कापड दुकाने असून, कापड खरेदीसाठी सध्या बाजारात मोठी गर्दी होत आहे़ सहामाही परीक्षा संपल्यामुळे आणि निवडणुकीची धांदल उरकल्यामुळे सध्या बाजारात कापड खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे़ महिला वर्गाकडून डिझायनर व एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साड्यांना मोठी मागणी असून, कश्मिरी साड्याही महिला आवर्जून खरेदी करतात, असे विक्रेत्यांनी सांगितले़
पुरुष वर्गाकडून जीन्स, शुटींग कपड्यांना मोठी मागणी आहे़ तरुणांमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेले शर्ट घेण्याचा ट्रेंड अजूनही आहे़ लहान मुलांमध्ये कपडे खरेदीची उत्सुकता मोठी असते़ यंदा प्रथमच बाजारात मोदी ड्रेस आला आहे़ मोदी ड्रेस खरेदीसाठी मुलांची सर्वाधिक पसंती आहे़ त्यानंतर सिंघम ड्रेस व राजनिती ड्रेसला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़