लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरोधात मोक्काचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:09+5:302020-12-13T04:36:09+5:30
लॉरेन्स स्वामी (रा. भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी ), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव रोड), विक्रम गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहब ...

लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरोधात मोक्काचा प्रस्ताव
लॉरेन्स स्वामी (रा. भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी ), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव रोड), विक्रम गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहब आढाव (दोघे रा. वाळुंज पारगाव ता. नगर), संदीप वाकचौरे, बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी), अर्जन ठुबे यांच्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोलापूर रोडवरील छावणी परिषद नाका येथे २० नोव्हेंबर रोजी दरोडा टाकून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत ४६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली होती. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रथम आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स याच्या घराचा दरवाजा तोडून त्याला अटक केली होती. दरम्यान, या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींविरोधात याआधीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी या गँगविरोधात मोक्कातंर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठिवला आहे. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडून विशेष पेालीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
संघटित गुन्हेगारांच्या आवळणार मुसक्या
संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी संकलित करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात मोक्का, एमपीडीए व तडीपारी अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.