मोबाईल चोर एका तासात जेरबंद : राहुरी पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 20:17 IST2019-02-27T20:16:48+5:302019-02-27T20:17:42+5:30

राहुरी बसस्थानक परिसरात बुधवारी (दि.२७) सुनंदा दहातोंडे या महिलेच्या हतातून मोबाईल हिसकावून पळालेल्या भामट्याला पोलिसांनी एका तासात पकडून गजाआड केले आहे.

Mobile thief martyr in one hour: performances of Rahuri police | मोबाईल चोर एका तासात जेरबंद : राहुरी पोलिसांची कामगिरी

मोबाईल चोर एका तासात जेरबंद : राहुरी पोलिसांची कामगिरी

राहुरी : राहुरी बसस्थानक परिसरात बुधवारी (दि.२७) सुनंदा दहातोंडे या महिलेच्या हतातून मोबाईल हिसकावून पळालेल्या भामट्याला पोलिसांनी एका तासात पकडून गजाआड केले आहे. त्याच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली.
राहुरी नगरपरिषदेतील महिला बचत गट समन्वयक सुनंदा दहातोंडे सकाळी दहाच्या सुमारास राहुरी बसस्थानकात उतरून नवीपेठकडे येत होत्या. यावेळी त्या रस्त्याने मोबाईलवर बोलत चालल्या असताना विना नंबरच्या मोटरसायकलवर आलेल्या एका भामट्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकली. दहातोंडे यांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले व सर्व हकीगत सांगितली. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात व शिपाई महेंद्र गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये त्या मोबाईल चोराला पकडले. त्या आरोपीचे नाव दिगंबर दिलीप म्हसे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) असे आहे.

 

Web Title: Mobile thief martyr in one hour: performances of Rahuri police