मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:49+5:302021-08-21T04:25:49+5:30
------------- दुचाकीची चोरी अहमदनगर : सारसनगर येथे मोटारसायकल चोरीची घटना घडली. याप्रकरणी सुरेखा अजय साके (रा. औसरकर मळा, सारसनगर) ...

मोबाईलची चोरी
-------------
दुचाकीची चोरी
अहमदनगर : सारसनगर येथे मोटारसायकल चोरीची घटना घडली. याप्रकरणी सुरेखा अजय साके (रा. औसरकर मळा, सारसनगर) यांनी भिंगार पोलिसात फिर्याद दिली. १७ ते १८ ऑगस्टदरम्यान सुरेखा साके यांची १० हजार रूपये किमतीची दुचाकी (आरजे १ एनएन ५३३०) औसरकर मळ्यातील शुभम रेसिडेन्सी येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
-----------
गायीची चोरी
अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारातून ३५ हजार रूपये किमतीची काळ्या रंगाची जर्सी गाय चोरीला गेली. याप्रकरणी संदीप यादव पवार (रा. पिंपळगाव) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १८ ते १९ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्याने ही गाय चोरून नेली.
----------------
अपघातात दुचाकीस्वार ठार
अहमदनगर : नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी-राळेगण रस्त्यावर दुचाकीस्वाराला धडक बसल्याचे त्याचा मृत्यू झाला. पोपट बापू गिरवले (वय ३७, रा. देऊळगाव) असे अपघातातील मृताचे नाव आहे. १२ ॲागस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास गिरवले हे देऊळगाव-राळेगण रस्त्यावरून दुचाकीवर जात असताना अज्ञात वाहनचालकाने गिरवले यांना धडक दिली. त्यात जखमी झाल्याने गिरवले यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बापू गणपत गिरवले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.