रोटरी क्लबकडून विद्यार्थिनींना मोबाइल भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:19 IST2021-01-21T04:19:14+5:302021-01-21T04:19:14+5:30

यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, धरमचंद ...

Mobile gift to students from Rotary Club | रोटरी क्लबकडून विद्यार्थिनींना मोबाइल भेट

रोटरी क्लबकडून विद्यार्थिनींना मोबाइल भेट

यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, धरमचंद फुलफगर, प्रकाश बोरा, शिरीष गादिया या पदाधिकाऱ्यांनी प्रशालेला भेट देत धोकादायक इमारतीची पाहणी केली. लवकरच अत्याधुनिक भव्य इमारतीचे बांधकाम संस्था, ग्रामस्थ व शिक्षकांच्या सहकार्यातून पूर्णत्वास नेण्याचा संकल्प अध्यक्ष अनिल बोरा, नंदकुमार निकम यांनी व्यक्त केला.

पुणे येथील रोटरी क्लबचे अजय दुबे व अध्यक्ष अनिल बोरा यांच्या वतीने ऑनलाइन शिक्षणासाठी १० गरजू विद्यार्थिनींना चांगल्या दर्जाचे मोबाइल देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर.टी. शिंदे, लक्ष्मीकांत दंडवते, विश्वास गुंजाळ, सर्जेराव कौठाळे, वसंत बनकर, संपतराव गाडेकर उपस्थित होते. संदीप घावटे यांनी आभार मानले.

...

फोटो-२०देवदैठण स्कूल मोबाईल

...

ओळी :

देवदैठण येथील विद्यार्थिनींना ऑनलाइन अभ्यासाकरिता रोटरी क्लब (पुणे) यांच्या वतीने मोबाइलचे वितरण करताना संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम व पदाधिकारी.

Web Title: Mobile gift to students from Rotary Club