मुलांना मोबाईल, पालकांना व्यसनमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:59+5:302021-08-13T04:24:59+5:30
क्रांतिदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला डॉन बास्को शाळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ...

मुलांना मोबाईल, पालकांना व्यसनमुक्तीची शपथ
क्रांतिदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टला डॉन बास्को शाळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, डॉन बॉस्को शाळेचे प्राचार्य रेव्हरंड फादर जेम्स तुस्कानो, आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक पद्माकर कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक अमृता फुटाणे, डॉ. सीमा ढोकणे, रोहन भोसले, डॉन बास्कोचे रेक्टर रेव्हरंड फादर रिचर्ड डिसोझा आदी उपस्थित होते. केवळ मोबाईलमुळे काही मुले शिक्षणापासून वंचित राहिल्याचे डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक फादर जेम्स यांना कळाले. त्यांनी याबाबत आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक पद्माकर कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. कुलकर्णी यांनी समाजातील दानशुरांच्या मदतीने मुलांची ही गरज पूर्ण केली. आता ही मुले घरी बसून ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत. डॉन बॉस्कोमधील १७, प्रगत माध्यमिक विद्यालय, नवीपेठ येथील ५, कै. दामोधर विधाते विद्यालय, सारसनगर येथील ४, जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा २, हनुमान टाकळी विद्यालयातील २ अशा ३० विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यात आले. आठवीची विद्यार्थिनी भक्ती रेवणनाथ पवार हिने पालकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. या उपक्रमात शाळेचे नितीन गायकवाड, रवी मुतोंडे, फान्सिस पाटोळे, मनीषा शिंदे, सुप्रिया खरात यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आर्ट आफ लिव्हिंगने नगर जिल्ह्यात केलेल्या कार्याबद्दल पद्माकर कुलकर्णी यांच्यासह पद्मा कुलकर्णी, नारायणी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फादर जेम्स यांनी ऑनलाईन शिक्षण आणि व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले.
----------
फोटो- १२ आर्ट ऑफ लिव्हिंग
अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगने गरजू ३० मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल दिले. यावेळी पद्माकर कुलकर्णी, फादर जेम्स तुस्कानो, सीमा ढोकणे, अमृता फुटाणे, पद्मा कुलकर्णी आदी.