मोबाईल कॉल दर होणार ३ पटीने कमी
By Admin | Updated: June 11, 2014 00:17 IST2014-06-10T23:37:59+5:302014-06-11T00:17:24+5:30
लोकमत व टेलिकॉम आॅपरेटर कंपनीने आणली अभिनव योजना
मोबाईल कॉल दर होणार ३ पटीने कमी
अहमदनगर : प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेल्या मोबाईललाही महागाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे मोबाईलचे कॉल दर दिवसेंदिवस वाढत असून ते आता सामान्यांच्या अवाक्याबाहेर जावू लागले आहेत. या कॉल दराच्या महागाईला ‘लोकमत’ आळा घालणार आहे टेलिकॉम आॅपरेटरच्या साथीने! तळागाळातील नागरिकालाही परवडेल अशी एक खास योजना लवकरच नगरकरांच्या भेटीला येत आहे. ‘लोकमत’चा अंक घेऊन या योजनेत नागरिकांना भाग घेता येणार असून, त्यांना सध्याच्या कॉलरेटपेक्षा तब्बल ३ पटींने कमी दर असलेले टेलिकॉम आॅपरेटर कंपनीचे सिमकार्ड मिळणार आहे.
मोबाईल आज प्रत्येकाच्या गरजेची वस्तू झाली आहे. त्यामुळे टेलिकॉमची सेवा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. मात्र महागाईमुळे आज या कंपन्या कॉलचे दर दिवसेंदिवस वाढवत आहे. साधारणत: सेकंद आणि एका मिनिटासाठी सुमारे १ रूपयापर्यंत दर काही कंपन्यांकडून आकारला जात आहे. एवढेच नव्हे तर काही कंपन्या प्रत्येक सेकंदालाही पैसे आकारतात. यात एसटीडी कॉलचे दर, इतर कंपन्यांच्या मोबाईलवर केलेल्या फोनचे दर तर खूपच जास्त असतात. यामुळे मोबाईलचे बील देणे किंवा रिचार्ज करणे अनेकांना जिकीरीचे झाले आहे. आणि सामान्यांचे खिसे खाली होत आहेत.
हा त्रास ओळखून ‘लोकमत’ आणि एका टेलिकॉम आॅपरेटर कंपनीने वाढत असलेल्या दरांना छेद देत सध्या बाजारात असलेल्या दरांपेक्षा तब्बल ३ पटींने कमी कॉल दर असलेली एक योजना आणली आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत देशभरात कोठेही फोन केला तरी कॉल दर एकच राहणार आहे. लोकल कॉल असो किंवा एसटीडी कॉल दर एकच आणि सर्वात कमी असल्याने मोबाईल ग्राहकांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच असणार आहे. या योजनेअंतर्गत ‘लोकमत’च्या अंकाबरोबर वाचकांना सिमकार्ड व कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.
‘लोकमत’मध्ये या योजनेची जाहिरात दि. १२ जून रोजी येणार असून ती घेऊन सिमकार्ड मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात गेल्यानंतर कमी कॉलरेटची आॅफर दिलेल्या टेलिकॉम आॅपरेटर कंपनीचे सिमकार्ड आणि त्याचे कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळातही अशी एक अभिनव योजना ‘लोकमत’च्या वाचकांसाठी आणण्यात आली होती. ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि अनेक ग्राहकांना त्याचा फायदा झाला होता. (प्रतिनिधी)
अशी आहे योजना...
कॉल रेट सर्वांपेक्षा कमी
एसटीडी कॉल रेटही लोकल दराप्रमाणेच
सिमकार्ड मिळणार पूर्णपणे मोफत
कनेक्शनसाठी एक रूपयाही द्यावा लागणार नाही