मनसेचे सभासद नोंदणी अभियान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:51+5:302021-03-15T04:19:51+5:30
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पहिला फॉर्म भरून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, ...

मनसेचे सभासद नोंदणी अभियान सुरू
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पहिला फॉर्म भरून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, उपजिल्हाप्रमुख मनोज राऊत, शहर सचिव नितीन भुतारे, मनसे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. अनिता दिघे, परेश पुरोहित, अशोक दातरंगे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामूल, संकेत होशिंग, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, दीपक दांगट आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले, मराठी बांधवांच्या न्याय, हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणात सक्रिय आहे. एक सक्षम पक्ष म्हणून मनसेची वाटचाल सुरू आहे. युवकवर्गांमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे मोठे आकर्षण आहे. त्यांच्या विचाराने पक्षात काम करण्यास मोठ्या संख्येने युवावर्ग तयार आहे. मनसेची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून, युवकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
--
फोटो- १४ मनसे
नगर शहरातील टिळक रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, उपजिल्हाप्रमुख मनोज राऊत, शहर सचिव नितीन भुतारे, मनसे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. अनिता दिघे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.