शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत पाहिला नाही- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 12:27 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे.

ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अण्णांचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. 

अहमदनगर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी अण्णांचं म्हणणं जाणून घेतले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. निर्दयी सरकारसाठी जिवाची बाजी लावू नका, मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका. केवळ अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच मोदी आणि त्यांचे सहकारी आज सत्तेवर बसले आहेत.  तसेच पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरही त्यांनी टीका केली आहे. सीबीआय विरुद्ध पोलीस हा प्रकार भयानक आहे. सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर मोदी सरकार नियंत्रण ठेवू पाहत आहे. अण्णांमुळे केजरीवाल जगाला माहिती झाले, आज ते केजरीवाल अण्णांना भेटायलादेखील येत नाहीत. 

कॉंग्रेस सरकार सत्तेत असताना ‘लोकपाल’ कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती. १८ डिसेंबर २०१३ रोजी जेव्हा ‘लोकपाल’चे बिल राज्यसभेत मंजूर झाले त्यावेळी मोदी यांनी ‘टि्वट’ करून आनंद व्यक्त केला होता. ‘लोकपालचे बिल पास होणे हा अण्णांची जिद्द व त्यांच्या मेहनतीचा एक प्रकारे सन्मान आहे. त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा’ असे ते या टि्वटमध्ये म्हणाले होते.‘लोकपाल’चे बिल मंजूर करण्यासाठी सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी सकारात्मक भूमिका पार पाडली, त्याबद्दल मला अभिमान आहे’, असेही टि्वट त्यांनी केले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अण्णा हजारे यांची प्रशंसा करणारी भाषणे केली होती.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी