टंचाई परिस्थितीचे आमदारांना गांभीर्य नाही

By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:34:21+5:302014-07-14T00:58:43+5:30

कोपरगाव : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे़ तालुक्यातील दुष्काळाकडे आ़ अशोक काळे यांचे दुर्लक्ष झाले आहे़

The MLAs of the scarcity situation have no seriousness | टंचाई परिस्थितीचे आमदारांना गांभीर्य नाही

टंचाई परिस्थितीचे आमदारांना गांभीर्य नाही

कोपरगाव : तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे़ तालुक्यातील दुष्काळाकडे आ़ अशोक काळे यांचे दुर्लक्ष झाले आहे़ मागील दहा वर्षात अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची टीका संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली़
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर या टंचाईग्रस्त गावांचा दौरा कोल्हे यांनी केला़ यावेळी संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, संचालक अरुण येवले, विश्वास महाले, बाळासाहेब वक्ते, शिवाजी वक्ते, सुनील देवकर, बापूसाहेब औताडे, रामदास रहाणे, नानासाहेब गव्हाणे उपस्थित होते़
कोल्हे म्हणाले की, नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी संजीवनीने उपपदार्थांची निर्मिती बंद केली आहे़ तेथून काही गावांना पाणी दिले जात आहे़ शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत सर्वंकष पीकविम्यात ऊस, कांदा, कापूस, भुईमुग, सोयाबीन, तूर व बाजरी पिकांचा विमा हप्ता भरावा, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी श्रीपत गवळी, कैलास संवत्सरकर, नामदेव ठोंबरे, रावसाहेब गोर्डे, नानासाहेब वर्पे, अनिल खालकर, संजय दिघे, हरिभाऊ गुडघे, अजित गुडघे, सुभान सय्यद, अर्जुन गव्हाणे, दशरथ कोटकर, भाऊसाहेब गव्हाणे, रावसाहेब गव्हाणे, प्रकाश गव्हाणे, विजय गव्हाणे, सुनील रहाणे, वाल्मिक कांडेकर, अजय गव्हाणे, संदीप रणधीर, शहाजी वर्पे उपस्थित होते़

Web Title: The MLAs of the scarcity situation have no seriousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.