आमदार, खासदारांनी सोशल मीडियावरच साजरा केला गोपाळकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:45+5:302021-09-02T04:46:45+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी स्मार्ट होऊ लागले आहेत. सण, उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर देण्यात येत ...

आमदार, खासदारांनी सोशल मीडियावरच साजरा केला गोपाळकाला
अहमदनगर : जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी स्मार्ट होऊ लागले आहेत. सण, उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲपसह ट्विटरचाही वापर करण्यात येत आहे. दहीहंडी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेसह सर्वच उत्सवांच्या शुभेच्छाही सोशल मीडियावरून देण्यात येत आहे. सोशल मीडिया हा प्रसिद्धीचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे त्याचा वापर अधिक होतो.
......
खासदार विखे फेसबुक, इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे हे फेसबुकवर ॲक्टिव्ह असतात. त्यांचे दिवसाभराचे कार्यक्रम, दौरे, पूरपरिस्थितीची पाहणी, उद्घाटने, विकासकामांचा शुभारंभ, बैठका आदींच्या कार्यक्रमांचे अपडेट सोशल मीडियावर देत असतात.
......
निलेश लंके, सोशलवर चर्चेत
राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे फेसबुकवर नेहमीच चर्चेत असतात. कोविड केअर सेंटरसह विकासकामांची उद्घाटने, बैठका आदी अपडेट सोशल मीडियावर देण्यात येतात.
......
संग्राम जगतापांच्या शुभेच्छा
राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे फेसबुकवर ॲक्टिव्ह असतात. त्यांच्या विविध कार्यक्रमांचे अपडेट सोशल मीडियावर दिले जातात. सध्या मंदिरे बंद असल्याने श्रावणी सोमवारसह गोपाळकाल्याच्या शुभेच्छा त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून दिल्या आहेत.
....
रोहित पवार यांच्याकडून शुभेच्छा
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी श्रावणात त्यांच्या फेसबुक पेजवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विविध कार्यक्रम, दौरे, भेटी, बैठकांचे अपडेट सोशल मीडियावर देण्यात येतात.
.....
शंकरराव गडाख यांची यंत्रणा
मंत्री शंकरराव गडाख यांच्या विविध दौरे, कार्यक्रमांची अपडेट सोशल मीडियावर दिली जाते. त्यांच्या यंत्रणेकडून कार्यक्रमांची छायाचित्रे, भेटी, वाढदिवसाच्या शुभेच्छा, श्रावणातील उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी गडाख यांच्या यंत्रणेकडून सोशल मीडियावर वापर केला जात आहे.
.....
डमी क्रमांक- ११२४