आमदारांनी साधला गुजरातमधील व्यापाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:53+5:302021-02-06T04:36:53+5:30
तालुक्यात औद्योगिक वसाहत व्हावी अशी मागणी अनेक वर्षापासुन सातत्याने होत आहे. गेल्या तीस वर्षापासुन अनेक राजकीय मंडळीनी विधानसभेच्या प्रचारसभेत ...

आमदारांनी साधला गुजरातमधील व्यापाऱ्यांशी संवाद
तालुक्यात औद्योगिक वसाहत व्हावी अशी मागणी अनेक वर्षापासुन सातत्याने होत आहे. गेल्या तीस वर्षापासुन अनेक राजकीय मंडळीनी विधानसभेच्या प्रचारसभेत कायमच अकोलेकरांना भुलवण्यासाठी अशी शक्कल केली होती, माञ अकोले येथील एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत उपमुख्यमंञी अजित पवार यांनी अकोले तालुक्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक ठिकाणी रोगजगार उपल्बध करुन देऊ त्यासाठी एमआयडीसीची उभारणी करु, असा शब्द दिला होता. यानंतर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी लिंगदेव या गावी संपादित करण्यासाठी जमिन पाहणी केली होती. या नंतर पुन्हा सबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी केली आहे. मंगळवारी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या पार्श्वभूमीवर सिल्वासा, दिव, दमन येथील उद्योजकांशी बैठक करुन त्यांनी अकोलेसारख्या ग्रामिण भागात येऊन आपले उद्योग सुरु करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पाणी, वीज, जमीन, रस्ते उपल्बध करुन दिले जाईल. तसेच स्थानिक बेरोजगारांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे अकोलेत औद्योगिक वसाहात साकारण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहे.
यावेळी उद्योजक चंद्रकांत कथावला, अतुल शहा, अजित देशपांडे, आनंद निकम, बाबू डेरे, माधव शेळके, नैनाराम चौधरी, योगेश बंगाले, प्रवीण जैन, सुदाम गुंजाळ, शिवाजी वाळूंज, मंगेश बेंडे, दिलीप दिघे, अजय टाकले, अरुण मोरे, अजित गुळवे, योगेश सोनवणे, विष्णू सहाणे, मधुकर शिंदे, हितल पांचाल, गोकुळ देशमुख, साहेबराव शेटे, संपत कातोरे, शिवाजी जाधव, ऋषी पवार, रणजीत पवार, संजय शिंदे, दीपक डेरे, भारत येवले, प्रवीण थोरात आदी उपस्थित होते.