शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 15:57 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.

ठळक मुद्देपोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ अन्य १७ आरोपींच्या पोलीस कोठडीतही वाढ

अहमदनगर -  पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. याप्रकरणी तोडफोडप्रकणातील अन्य १७ आरोपींच्या पोलीस कोठडीतही एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. 

तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत १२ एप्रिलपर्यत न्यायालयाने वाढ केली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. आज न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची १३ एप्रिलपर्यत वाढ केली आहे. आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेSangram Jagtapआ. संग्राम जगतापArun Jagtapआ. अरुण जगतापBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस