Ahmednagar: बंद पडलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजितत तांबे यांनी आणला ५५ लाखांचा निधी
By अरुण वाघमोडे | Updated: April 7, 2023 18:02 IST2023-04-07T18:01:25+5:302023-04-07T18:02:04+5:30
Satyajit Tambe: अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे.

Ahmednagar: बंद पडलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सत्यजितत तांबे यांनी आणला ५५ लाखांचा निधी
- अरुण वाघमोडे
अहमदनगर - अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे बंद पडलेल्या महापालिकेच्या सावेडी येथील स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आमदार सज्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडून ५५ लाखांचा निधी आणला आहे. या निधीच्या माध्यमातून हे केंद्र पुन्हा कार्यन्वित करून येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर आले असता आ. तांबे यांनी या केंद्राची पाहणी करत निधीबाबत माहिती दिली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नगर शहरात राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने मनपाने २००७ रोजी सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक येथे मोफत स्वरुपात हे केंद्र सुरू केले होते. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून इमारतही बांधण्यात आली होती. स्व. प्रा. एन.बी. मिसाळ यांनी केंद्राचे संचालक म्हणून ११ वर्षे काम पाहिले.
मागील तीन ते चार वर्षांत मात्र हे केेंद्र बंद पडले. दरम्यान मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाही. आता आ. तांबे यांनी या केंद्रासाठी भरीव निधी आणल्याने हे केंद्र लवकरच कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान आ. तांबे यांनी केंद्राची पाहणी केली तेव्हा त्यांच्यासमवेत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे उपस्थित होते.